बारामतीत काका-पुतण्या आमनेसामने, भरले उमेदवारी अर्ज

बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

बारामतीत काका-पुतण्या आमनेसामने, भरले उमेदवारी अर्ज

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. काका – पुतण्या आमनेसामने असतील. अजित पवार १९९१ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा विजयी झाले. यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार विजयी झाले. यामुळे २०२४ मध्ये अजित पवार बारामती राखणार की युगेंद्र चमत्कार करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

निवडणुकीसाठी अजित पवारांनी सोमवार २८ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी देवदर्शन केल्यानंतर शक्तिप्रदर्शन केले. यानंतर उमेदवारी अर्ज भरला. अजित पवारांप्रमाणेच देवदर्शन केल्यानंतर शक्तिप्रदर्शन करत युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number