Baramati Bypoll Election: बारामतीच्या आखाड्यातून शरद पवार गटाची माघार; शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केली राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका

या दोन पोटनिवडणुकांमुळे राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा सुरू आहे.

Baramati Bypoll Election: बारामतीच्या आखाड्यातून शरद पवार गटाची माघार; शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केली राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका

मुंबई: राज्यात बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, बारामती विधानसभा पोटनिवडणूक आम्ही लढवणार नाही. “बारामतीतून आमचा उमेदवार नसेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुरीबाबत चर्चा सुरू

मात्र, राहुरी पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, “राहुरी संदर्भात आम्ही विचार करू. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेससोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.”

हेही वाचा: Raghav Chadha vs AAP: ‘हा तर फक्त ट्रेलर, पूर्ण पिक्चर अजून बाकी…’; राघव चढ्ढा यांचा ‘आप’ला पुन्हा इशारा

राजकीय समीकरणांना वेग

या दोन पोटनिवडणुकांमुळे राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा सुरू आहे.

एकूणच, बारामतीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) निवडणूक न लढवण्याचा निर्णय आणि राहुरीबाबत खुली ठेवलेली भूमिका यामुळे आगामी राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: Custom Officer Blackmailed: आधी मैत्री करायचा… नंतर लग्नाचं आमिष अन् मग ब्लॅकमेलिंग; नराधमाने सीमाशुल्क विभागाची संवेदनशील माहिती चोरली अन् अधिकाऱ्यांनाच अडकवलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number