Baramati ByElection: सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा अधिकार; बोलताना कंठही दाटून आला, म्हणाल्या, ‘हे मान्य केलं पाहिजे…’

या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.

Baramati ByElection: सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा अधिकार; बोलताना कंठही दाटून आला, म्हणाल्या, ‘हे मान्य केलं पाहिजे…’

बारामती: राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेली बारामती विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान सुरू झाले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत असून, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महायुतीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांवर विश्वास व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांकडे पाहून मतदार मतदान करतील, असा त्यांचा दावा आहे. “बारामतीकरांनी ही निवडणूक हातात घेतली असून, प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून मतदानासाठी घराबाहेर पडत आहे,” असे त्या म्हणाल्या.

या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच अजित पवार यांच्या मातोश्री वयोमानामुळे मतदान केंद्रावर न जाता घरून मतदान केल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. “त्यांचे आशीर्वाद घेऊन मी मतदानासाठी आले आहे,” असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Donald Trump: ‘युद्ध संपवण्याची आम्हाला घाई नाही’; डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नौदल प्रमुखांचीच केली हाकालपट्टी

“बारामतीकरांनी गेल्या 60 वर्षांपासून पवार कुटुंबाला साथ दिली आहे आणि ती आजही कायम राहील,” असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांची परतफेड करण्यासाठी मतदार मतदानाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहतील, असेही त्या म्हणाल्या.

सध्या बारामतीत मतदान केंद्रांवर मतदारांची चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. भावनिक आणि प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला मिळणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. काही तासांतच मतपेटीत बंद झालेले उमेदवारांचे भविष्य उघड होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. 

हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर दुहेरी अस्मानी संकट! एका बाजूला कडाक्याचं ऊन तर दुसरीकडे गारपिटीच्या तडाख्याची शक्यता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number