‘मराठी माणूस वाट पाहत आहे..लवकर एकत्र या’; ठाकरे बंधूंच्या युतीसाठी बॅनरबाजी

ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन करणारी बॅनरबाजी. 'मराठी माणूस वाट पाहत आहे.. लवकर एकत्र या' असा ठळक मजकूर या बॅनरवर छापलेला आहे.

‘मराठी माणूस वाट पाहत आहे..लवकर एकत्र या’; ठाकरे बंधूंच्या युतीसाठी बॅनरबाजी

मुंबई: मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री परिसरात नुकतेच एक लक्षवेधी दृश्य दिसून आले  ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन करणारी बॅनरबाजी. 'मराठी माणूस वाट पाहत आहे.. लवकर एकत्र या' असा ठळक मजकूर या बॅनरवर छापलेला असून, त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित जुना फोटो बॅनरवर झळकत आहे.

या बॅनरमुळे दोन्ही नेत्यांमधील संभाव्य युतीच्या चर्चांना नवसंजीवनी मिळालेली आहे. राजकीय वर्तुळात सध्या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगली असून, या पार्श्वभूमीवर ठाणे, गिरगावनंतर आता थेट ठाकरे कुटुंबीयांच्या निवासस्थानासमोर अशा बॅनरचे दर्शन झाल्याने ही चर्चा अधिकच वाढू लागली आहे. 

हेही वाचा: सांगलीत अजि तपवार गटाची ताकद वाढणार, भाजपाचे चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

या बॅनरवरील मजकूर विशेषतः मनाचा ठाव घेणारा आहे  'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या.' मराठी जनतेच्या भावना आणि आशा यांचे प्रतिबिंब या संदेशात स्पष्टपणे दिसते. सध्याच्या राजकीय वातावरणात महाराष्ट्रातील मराठी माणूस ठाकरे कुटुंबातील ऐक्याच्या प्रतीक्षेत आहेत.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय आणि भावनिक एकतेची अपेक्षा जनतेला असून, अशा सार्वजनिक बॅनरबाजीमुळे या युतीची शक्यता अधिकच चर्चेत आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number