Gulabrao Patil Son Banner : गुलाबराव पाटलांच्या चिरंजीवांचे शहरात झळकले बॅनर! ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर

जळगावात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे भावी आमदार आशयाचे बॅनर लागले आहेत.

Gulabrao Patil Son Banner : गुलाबराव पाटलांच्या चिरंजीवांचे शहरात झळकले बॅनर! ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर

जळगावात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे भावी आमदार आशयाचे बॅनर लागले आहेत. जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक आणि आकाशवाणी चौकसह वेगवेगळ्या चौकांमध्ये प्रतापराव पाटील भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहेत. प्रतापराव पाटील यांचा 28 एप्रिल रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी भावी आमदार असे बॅनर लावले. मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे ‘भावी आमदार’ म्हणून जळगावमध्ये बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number