शिवसेना भवनासमोर शिवसेनेची बॅनरबाजी

दादरमध्ये सद्या एका बँनरची चांगलीच चर्चा रंगलीय.शिवसेना माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवन समोर राज ठाकरे यांना डिवचणारा एक बॅनर लावला आहे.

शिवसेना भवनासमोर शिवसेनेची बॅनरबाजी

दादर: दादरमध्ये सद्या एका बँनरची चांगलीच चर्चा रंगलीय.शिवसेना माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवन समोर राज ठाकरे यांना डिवचणारा एक बॅनर लावला आहे. गंगाजल शुद्धच आहे पण बाकीच्या विचारांच काय म्हणत टीका केली आहे.राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून गंगेचं अस्तित्व मांडत वक्तव्य केलं होतं.त्याला उत्तर म्हणून बॅनर लावला आहे.

हेही वाचा: राज्यात अवकाळीच संकट?

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कुंभमेळ्यातील गंगा नदीच्या प्रदुषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. हे पाणी शुद्ध मानून पिणाऱ्यांची राज ठाकरे  यांनी एकप्रकारे खिल्ली उडवली होती. याच मुद्द्यावरुन सदा सरवणकरांच्या पुत्राने राज ठाकरे यांना डिवचले आहे. 'गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय?', असा मजकूर समाधान सरवणकर यांनी लावलेल्या फलकावर लिहला आहे. यामुळे दादरमध्ये या बँनरची चांगलीच चर्चा रंगलीय. 

दरम्यान शिवसेना भवनासमोर शिवसेना शिंदे गटाने लावलेल्या बॅनरमुळे मनसैनिक आक्रमक झाले. माजी आमदार असलेल्या सरवणकर यांचा प्रवास शिवसेना, काँग्रेस शिवसेना ठाकरे गट, आता शिवसेना शिंदे असा झाला आहे. सरवणकर यांनी राज ठाकरेंना हिंदुत्वाबाबत शिकवावं अशी वेळ आली नसल्याचेही मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number