भिवंडीत अडीच कोटी रुपयांचा गुटखा, पान मसाला जप्त

राज्य भरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सर्रासपणे सुरु असून त्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न प्रशासन विभाग व पोलीस विभागाने कंबर कसली आहे. भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील सिद्धीनाथ कॉम्प्लेक्समधील गोदामांवर नारपोली पोलीस व अन्न प्रशासन विभाग यांनी संयुक्त कारवाई केली. तेव्हा या गोदामात 2 ट्रक मध्ये […]

भिवंडीत अडीच कोटी रुपयांचा  गुटखा, पान मसाला जप्त

राज्य भरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सर्रासपणे सुरु असून त्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न प्रशासन विभाग व पोलीस विभागाने कंबर कसली आहे. भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील सिद्धीनाथ कॉम्प्लेक्समधील गोदामांवर नारपोली पोलीस व अन्न प्रशासन विभाग यांनी संयुक्त कारवाई केली. तेव्हा या गोदामात 2 ट्रक मध्ये असलेला तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू यांचा साठा जप्त करण्यात आला.

नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना दापोडा येथील सिद्धीनाथ गोदाम कॉम्प्लेक्स मधील बी 85 या गोदामात अनधिकृतपणे प्रतिबंधित गुटखा साठविला असल्याची माहिती मिळाली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक आर जे वरकटे यांच्यासह पोलीस पथकाने छापा मारला.

छाप्यामध्ये गोदामात पान पराग, शिखर, दिलबाग, मनपसंद, कोल्हापुरी यांसह असंख्य नावाने विकला जाणारा गुटखा साठवलेला आढळून आला.

त्यांनी अन्न प्रशासन विभाग ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधून कारवाई साठी पाचारण केले.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त एस एस देसाई, सहाय्यक आयुक्त डॉ भूषण मोरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत याबाबत कारवाई सुरू केली.

या कारवाईत अन्न निरीक्षक शंकर राठोड यांना या गोदाम संकुलात दोन ट्रक संशयास्पदरीत्या उभे असलेले दिसले.

त्यांची तपासणी केली असता त्यामध्येसुध्दा गुटखा आढळून आला. एकूण 2 कोटी 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

माल साठवणूक करणारा मोहम्मद इमरान नुरुद्दीन खान आणि माल साठवणुकीस मदत करणारे गोदाम मालक अमित देवचंद गोसरणी यांच्या विरोधात भादवी कलम 328, 181 सह अन्न सुरक्षा कायदा कलम 59 नुसार कारवाई केली जाणार आहे. गोदामतील व्यवस्थापक विशाल रघुनाथ मांडवकर ,नागेंद्रकुमार रामसुरत यादव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ भूषण मोरे यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number