Bank Holiday: ऑगस्ट महिना हा सण, उत्सव आणि सार्वजनिक सुट्ट्यांनी भरलेला असतो. 2025 चा ऑगस्ट महिना याही बाबतीत अपवाद ठरणार नाही. या महिन्यात विविध सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर त्याचे नियोजन आधीच करून ठेवणं अत्यंत गरजेचं ठरेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, भारतातील बँका झोननिहाय आणि राज्यनिहाय सुट्ट्या पाळतात. त्यामुळे ज्या दिवशी एखाद्या राज्यात सण असतो, त्या दिवशी तिथल्या झोनमधील बँका बंद राहतात. मात्र, अशा वेळी देशभरात ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहते, परंतु रोखीचे व्यवहार, पासबुक अपडेट, चेक व्यवहार, कर्ज प्रक्रिया अशा गोष्टींमध्ये अडचणी येऊ शकतात.ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी यांसारखे सण येतात. या सणांमुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. त्याशिवाय दुसऱ्या व चौथ्या शनिवारी आणि प्रत्येक रविवारी नियमित सुट्ट्या असतातच.
हेही वाचा: Parenting Tips: श्रद्धा की स्वास्थ्य? काळ्या धाग्यामागचं धोकादायक सत्य उघड; जाणून घ्या
ऑगस्ट 2025 मधील बँक सुट्ट्यांची प्रमुख यादी:
3 ऑगस्ट (रविवार): देशभरातील बँका बंद. त्रिपुरामध्ये केर पूजा निमित्त सुट्टी.
8 ऑगस्ट: सिक्कीम व ओडिशामध्ये ‘तेंडोंग लो रम फात’ मुळे बँका बंद.
9 ऑगस्ट: रक्षाबंधनमुळे उत्तर भारतातील 6 राज्यांमध्ये बँका बंद.
10 ऑगस्ट (रविवार): नियमित सुट्टी.
13 ऑगस्ट: मणिपूरमध्ये देशभक्ती दिनानिमित्त सुट्टी.
15 ऑगस्ट: स्वातंत्र्यदिन – देशभर बँका बंद.
16 ऑगस्ट: जन्माष्टमी व पारशी नववर्ष – गुजरात आणि महाराष्ट्रात बँका बंद.
17 ऑगस्ट (रविवार): नियमित सुट्टी.
23 ऑगस्ट (शनिवार): चौथा शनिवार – देशभर बँका बंद.
24 ऑगस्ट (रविवार): नियमित सुट्टी.
26 ऑगस्ट: गणेश चतुर्थी – कर्नाटक व केरळमध्ये बँका बंद.
27 ऑगस्ट: गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस – महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू, इ. राज्यांमध्ये बँका बंद.
28 ऑगस्ट: नुआखाई – ओडिशा, पंजाब, सिक्कीममध्ये बँका बंद.
31 ऑगस्ट (रविवार): नियमित सुट्टी.
महत्त्वाचा सल्ला:
बँकिंग व्यवहारांसाठी हा महिना खूपच व्यापलेला असणार आहे. त्यामुळे कर्ज, पासबुक, चेक क्लिअरिंग, एफडी किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींचं नियोजन योग्य वेळी करणे आवश्यक आहे. शेवटच्या क्षणी बँकेसमोर उभं राहून "आज सुट्टी आहे" अशी माहिती मिळाल्यास वेळ आणि श्रम वाया जातील.
ऑगस्ट महिन्यात सणासुदीचा आनंद लुटण्याआधी तुमचं बँकिंग काम वेळेत पूर्ण करा. तसेच, आवश्यक असल्यास, RBI च्या अधिकृत वेबसाइटवर प्रत्येक राज्यातील बँक सुट्ट्यांची अधिकृत माहिती तपासावी.
ऑनलाइन बँकिंग प्रणाली या काळात सुरू राहील, मात्र कॅश ट्रांजॅक्शन किंवा फिजिकल कामासाठी बँकेत जाणं टाळावं. वेळेवर नियोजन केल्यास बँक सुट्ट्यांचा कोणताही अडथळा येणार नाही.