बजरंग सोनावणे यांच्या गाडीला धडक

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपा ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे राशपचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

बजरंग सोनावणे यांच्या गाडीला धडक

बीड : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपा ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे राशपचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. वास्तविक विजयानंतर बजरंग सोनवणे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जात होते. यावेळी हा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ताफ्यातील अनेक कार्यकर्ते जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक शहागड पुलाजवळ त्यांच्याच ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धकडल्याने हा अपघात झाला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे आणि भाजपला मोठा धक्का देत बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयात मनोज जरांगे पाटील यांचा मोठा वाटा मानला जातो. बीडमध्ये मराठा समाजाची निर्णायक मते मनोज जरांगे यांच्या माध्यमातून बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात गेल्यानेच त्यांचा हा विजय झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच विजयी झाल्यानंतर लगेचच त्याच रात्री बजरंग सोनवणे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्याच ताफ्यातील एका दुसऱ्या वाहनाने सोनवणे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. मात्र, त्यानंतरही बजरंग सोनवणे यांनी आंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number