पुण्यात सोमवारी शनिवारवाड्यामध्ये एक आगळावेगळा योग जुळून आला. मस्तानीच्या (Mastani) वंशजांनी शनिवार वाड्याला (Shaniwar Wada) भेट दिली.
मस्तानीचे पुत्र समशेरबहादूर (Samsher bahaddur) यांच्या पुढच्या या पिढ्या आहेत.
मस्तानीच्या वंशजांपैकी नवाब इरफान अली बहादूर यांनी तसंच त्यांच्या कुटुंबातील 11 जणांनी शनिवारवाडा पाहिला.
बाजीराव पेशवे आणि मस्तानीच्या (Bajirao Mastani) कुटुंबातील बरेच जण पहिल्यांदाच पुण्यात आले होते.
शनिवारवाडा बघण्याचा ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
मस्तानीच्या वंशजांपैकी बरेचसे वंशज हे मध्य प्रदेशात राहतात.
इंदूर, सिल्लोर या शहरांमध्ये त्यांची घरं आहेत.
आजही ते सगळेजण एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.
ईद सोबत साजरी करतात.
पुण्यातील मस्तानीच्या (Bajirao Mastani) संबंधित अनेक जागांना त्यांनी भेटी दिल्या.
आमचे पुर्वज धर्माचा विचार न करता भारतासाठी लढले.
आताही सर्वांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
आतापर्यंत घरच्या वडीलधाऱ्यांकडून त्यांनी त्यांच्या घराचा इतिहास ऐकला होता तर सिनेमांमधून त्यांनी इतिहास पाहिला होता. आत्ताची पिढी विविध पुस्तकांच्या माध्यमातून पुर्वजांच्या उल्लेख शोधतेय. मात्र आज प्रत्यक्ष ती वास्तू पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झाला.