मुंबई, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : माझगाव न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना जामीन दिला आहे. शिवसेनेचे लोकसभा खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी केल्याच्या प्रकरणात हा जामीन देण्यात आला आहे. दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.
शेवाळे प्रकरणात उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने तर संजय राऊत थेट माझगाव न्यायालयात उपस्थित होते. यानंतर दोन्ही बाजू ऐकून माझगाव न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जामीन दिला.