शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने दिला होता.
येळ्ळूर मधील महाराष्ट्र मैदानात 13 एप्रिल 2018 ला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात केल्या होत्या.
या कुस्ती मैदानाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भिडे गुरुजी हजार होते.
त्यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होती. मात्र भिडे यांनी त्या समारंभात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं.
निवडणूक अधिकाऱ्यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.