Bachchu Kadu With Ashok Kharat : खरात आणि बच्चू कडू यांच्या नेमका काय संवाद? व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर बच्चू कडू यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ते खरातची भेट घेताना दिसत आहेत.

Bachchu Kadu With Ashok Kharat : खरात आणि बच्चू कडू यांच्या नेमका काय संवाद? व्हिडीओ व्हायरल

नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये आणि अत्याचार केल्याच्या आरोपांनंतर नाशिक पोलिसांनी खरातला ताब्यात घेतले असून सध्या त्याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली.

या प्रकरणात सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले होते. अशोक खरातसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग चढला होता. त्यानंतर चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, तपास पुढे जात असताना या प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. महिलांवर धर्माच्या नावाखाली अत्याचार केल्याचे अनेक आरोप खरातवर करण्यात आले असून त्यासंदर्भातील काही व्हिडिओही समोर आले आहेत.

हेही वाचा: Railways Ticket Refund Rules: रेल्वे प्रवाशांना मोठा झटका, तिकीट परतावा नियमांत मोठे बदल; जाणून घ्या किती पैसे कापले जाणार

बच्चू कडू यांचा व्हिडिओ व्हायरल

या पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचाही एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बच्चू कडू हे अशोक खरातला भेटताना दिसत आहेत. त्यांच्या हातात नारळ असून त्यांनी फेटा आणि शाल घालून खरात याची भेट घेतल्याचे दिसते.

व्हिडिओमध्ये बच्चू कडू हे अशोक खरातच्या पाया पडताना दिसतात. त्यावेळी झालेला संवादही व्हिडिओमध्ये ऐकू येतो.

अशोक खरात कडू यांना म्हणत आहे, “आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा इथे या.”

त्यावर बच्चू कडू म्हणतात, “ठीक आहे,” असे म्हणत ते खरातच्या पाया पडताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बच्चू कडू यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे या व्हिडिओबाबत बच्चू कडू काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणातून आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Nora Fatehi Song Controvercy: नोरा फतेहीवर ‘वर्क परमिट’चा गैरफायदा घेतल्याचा आरोप; 10 वकिलांची टीम सरसावली, अभिनेत्रीची भारतातून होणार हकालपट्टी?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number