मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर जरांगे करणार आंदोलन 

तुळजाभवानी मंदिरातून जरांगे पाटलांचा महाराष्ट्र सरकारला मुंबईत आंदोलनाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर जरांगे करणार आंदोलन 

मुंबई :  मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सरकारला इशारा देताना म्हटलं की, "सरकार कुणाचंही असो, आम्ही मुंडकावर पाय ठेवून आरक्षण घेणार." त्यांनी हे वक्तव्य करत सांगितले की मराठा समाजाचा हक्काच्या आरक्षणासाठी येणारे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर होणार आहे.

आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना जरांगे पाटील यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, "मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ शकत नाही. मराठा समाजाने ओबीसी आमदार निवडून आणले आहे, आणि आम्ही विधानसभा निवडणुकीच्या फॉर्मुल्यात नव्हतो, तर सुफडा साफ केला असता." त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "आम्ही मराठा आरक्षणासाठी सामूहिक उपोषण मुंबईतील आझाद मैदानावर करणार आहोत. या चळवळीला थांबवणार नाही."

पाटील यांचे हे वाक्य राज्यातील राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना, जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे की त्यांनी काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही आरक्षण मिळवण्यासंबंधी आंदोलनात भाग घेत आहात का? हे आंदोलन कधी आणि कुठे होईल, यावर जरांगे पाटील यांच्या पुढील निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number