राज्यात 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा राज्य सरकारने अंमलबजावणी केली आहे. राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. मिराभाईंदर मधील रिक्षावाल्यांना भेटण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते भाईंदरमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी मिराभाईंदर मधील रिक्षावाल्यांची भेट घेतली आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच मराठी या निर्णयाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच या निर्णयाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या निर्णयाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचपार्श्वभूमिवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी गुणरत्न सदावर्ते यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, “सदावर्ते स्वतः संरक्षण मिळावं राहावं यासाठी तो विविध पक्षांसंदर्भात बोलत असतो. सदावर्तेला योग्य वेळी प्रसादाचा कार्यक्रम हा दिला जाईल. 25 पोलिसांच्या गराड्यात फिरून मर्दाच्या गोष्टी करणं काही अर्थ नाही. आमच्या सोबत एकही पोलीस नसतो तरी आम्ही मर्दा सारखं बोलतो.लाखो मराठी चालक त्यादिवशी रस्त्यावरती असतील वेळप्रसंगी आमच्या गाड्यातून आम्ही लोकांना घरी सोडू महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होईल अशी कुठली गोष्ट घडणार नाही. संपानंतर यांनी रिक्षा रस्त्यावर चालून दाखवाव्यात.”
पुढे मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, “मला वाटतं हा नियम आताचा नाहीये शासन त्याची अंमलबजावणी आतापासून करत आहे. हा खूप आधीपासूनच आहे या नियमाची अंमलबजावणी होत नव्हती. खरंतर या लोकांची सुरुवात लायसन्स देतात त्यावेळेपासूनच होते. जेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्टचा लायसन घेतात त्यावेळेला मराठी तुम्हाला येणं हे सक्तीचा आहे. तुम्ही ज्या वेळेस पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला घेतात लायसन्स साठी आणि परमिट साठी गरजेचं असतं त्यात देखील त्याचा उल्लेख आहे. काही भ्रष्ट अधिकारी पैसे खाऊन यांना लायसन प्रोव्हाइड करतात वास्तव्याचा दाखला प्रोव्हाइड करतात आणि त्यातून खरे हे वाद तयार होतात. 500 हजार रुपयासाठी त्यांनी हे लायसन बनवले नसते तर आज ही वेळ आली नसती की त्यांना संप करायचे.
आम्हाला डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे डोळे जागेवर न ठेवता आम्ही आमच्या पद्धतीने करू. तुम्ही महाराष्ट्रात राहतात तुम्हाला मराठी येत नाही म्हणून तुम्ही बोलणार नाही आणि तुम्ही संपावर जात असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. 15 लाख हा आकडा आला कुठून हेच कळत नाही. आरटीओ अधिकाऱ्यांशी बोललो असता एम एम आर रिझन मध्ये तो आकडा चार लाखाच्या वर जात नाही हा पंधरा लाख आकडा आला कुठून. 65 टक्के परमिट होल्डर हे मराठी आहेत. 15 लाख हा जो आकडा आहे तो महाराष्ट्राचा वातावरण खराब करण्यासाठी काढलेला आहे. संपावर जाऊन बघा मग आम्ही दाखवतो.”