‘अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी’

अजित पवारांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार काल सरकारमध्ये सामील झाल्याने महाविकास आघाडीकडून अजित पवारांवर टीका केली जात आहे. अजित पवार काल राजभवनात दाखल झाल्यापासून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली होती. एवढंच नव्हे तर संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वैरही अनेकदा समोर […]

‘अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी’

अजित पवारांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार काल सरकारमध्ये सामील झाल्याने महाविकास आघाडीकडून अजित पवारांवर टीका केली जात आहे. अजित पवार काल राजभवनात दाखल झाल्यापासून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली होती. एवढंच नव्हे तर संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वैरही अनेकदा समोर आले होते. दरम्यान, संजय राऊत सातत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असतात. यामुळे त्यांचेच नेते अडचणीत येतात असा आरोप केला जातो. यावरून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून संजय राऊतांवर टीकास्त्र डागले आहे.

दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यापासून संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. यावरून अनेक नेते संजय राऊतांना लक्ष्य करतात. तसेच, संजय राऊत यांच्या बडबड्या वृत्तीमुळेच शिवसेनेत फुट पडली असा दावाही अनेकांनी केला आहे. संजय राऊतांमुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असाही आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो. त्यातच, संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हस्तक्षेप वाढल्याने राष्ट्रवादी फुटली अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात केली जात आहे. भाजपनेही असाच दावा केला आहे. यावरून आशिष शेलारांनी आता कवितेच्या माध्यमातूनच त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number