औरंगाबाद: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी फारशी कादरी यांना धमकी दिल्या प्रकरणात गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना प्रश्न विचारणाऱ्या फरीश कादरी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. जलील यांनी धमकी दिल्याचा ऑडिओदेखील व्हायरल झाला आहे.
‘अशा पद्धतीने एखाद्याला बोलणे योग्य नाही, अशी दादागिरी कशा करीता करायची? आता एमआयएमचे रूप नागरिकांना दिसत आहे. अशाप्रकारे एखाद्याला धमकी देणे योग्य नाही, गृहमंत्र्यांनी लक्ष घालून गुन्हा दाखल करावा’,असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.