विविध नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग

शनिवारी देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरा होत आहे. सकाळ पासूनच पुण्यातील विविध शिव मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. असे असले तरी अनेक शिव भक्तांकडून महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील हडपसर येथील काळेपडळ येथे राहणाऱ्या दिपक घोलप या तरुणाने चक्क ७९३०७ रुपये किंमतीचे २२ हजार ३०१ नाणे वापरून शिवलिंग बनविले आहे. गेल्यावर्षी […]

विविध नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग

शनिवारी देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरा होत आहे. सकाळ पासूनच पुण्यातील विविध शिव मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. असे असले तरी अनेक शिव भक्तांकडून महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील हडपसर येथील काळेपडळ येथे राहणाऱ्या दिपक घोलप या तरुणाने चक्क ७९३०७ रुपये किंमतीचे २२ हजार ३०१ नाणे वापरून शिवलिंग बनविले आहे.

गेल्यावर्षी या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.जगातीलही अशा प्रकारचे हे पहिलेच शिवलिंग असल्याचा दावा दीपक यांनी केला आहे. दीपक हा शिवभक्त आहे. काहीतरी वेगळं करावे, या विचारातून त्याला नाण्यांचा वापर करून शिवलिंग बनविण्याची संकल्पना सुचली. त्याने दोन, पाच, दहा रूपयांची नाणी जमवायला सुरूवात केली. चार महिने परिश्रम घेऊन त्याने अखेर एक आकर्षक शिवलिंग आकारास आणले.

दिपकने या शिवलिंगासाठी १४ हजार ९१६ पाच रुपयांची नाणी, ४ हजार ८७५ दहा रुपयांची नाणी, २ हजार ५१० एक रुपयाची नाणे असे मिळून एकूण ७९ हजार ३०७ रुपयांची हे शिवलिंग बनविण्यात आले आहे. माझी मोबाईल शॉपी आहे. कामा व्यतिरिक्त मी इतर कोणताही छंद जोपासलेला नाही. मी शिवाचा भक्त असल्याने शिवलिंगाच्या दर्शनासाठी म्हणून दररोज शिवालयात जातो. जगात कुणीही संकल्पना राबवली नसेल, असे शिवलिंग बनविण्याचा माझा मानस होता. नाण्यांपासून अशी चांगली कलाकृती होईल असा विचार करून चार महिने नाणी जमा करून हे आकर्षक शिवलिंग बनविता आले आहे. असे यावेळी दिपक घोलप याने सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number