Attack on Ship in Hourmuz: होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव शिगेला! जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, नौदलाकडे मागितली मदत, धक्कादायक व्हिडीओ समोर

जहाजावर 24 भारतीय खलाशी आहेत आणि त्यांनी तातडीच्या मदतीचे आवाहन केले आहे. 

Attack on Ship in Hourmuz: होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव शिगेला! जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, नौदलाकडे मागितली मदत, धक्कादायक व्हिडीओ समोर

इराण-इस्रायल युद्ध पुन्हा तीव्र झाल्याने होर्मुझ सामुद्रधुनीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर 24 भारतीय नागरिक अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली आहे.भारतीय खलाशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया या संघटनेने दावा केला आहे की, जहाजावर 24 भारतीय खलाशी आहेत आणि त्यांनी तातडीच्या मदतीचे आवाहन केले आहे. 

या संघटनेने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सांगितले की, होर्मुझजवळील एका जहाजावरून मदतीसाठी सूचना पाठवण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये जहाजाच्या स्थानाचे निर्देशांकही शेअर केले होते.

हेही वाचा – Donald Trump Warning: ‘ताबडतोब गोळीबार थांबवा…’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराण-इस्रायलला थेट इशारा 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जहाजावर अचानक हल्ला झाल्यानंतर क्रू सदस्यांनी व्हिडिओ जारी करत तातडीने मदतीची मागणी केली आहे. या जहाजावर भारतीय नागरिकांसह इतर देशांचेही कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर भारतीय नौदल आणि परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बचावकार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा – Middle-East War Update : मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका! इस्रायलचा इराणवर प्रतिहल्ला; तेहरान विमानतळ बंद, सौदीतही भीषण स्फोट 

होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील अत्यंत महत्त्वाचा तेलवाहतूक मार्ग असल्याने येथे घडणाऱ्या घटनांचा जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर तणाव आणखी वाढल्याचे दिसत आहे. अधिकृत तपशील आणि नुकसानाबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number