#जेएनएसयू अध्यक्षावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) आज राडा झाला. हा राडा जेएनयूएसयू आणि अभाविप विद्यार्थ्यांमध्ये झाला. विद्यार्थी संघटनेच्या महिला अध्यक्षेवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. आयशी घोष ही जेएऩयुच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आहे. अज्ञात हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले असल्याने त्याना ओळखता आले नाही. ड़ाव्या संघटनेकडून या हल्ल्याचा अभाविपवर आरोप केला आहे. माझ्यावर क्रूरतेने अज्ञात गुडांनी हल्ला केला. […]

#जेएनएसयू अध्यक्षावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) आज राडा झाला. हा राडा जेएनयूएसयू आणि अभाविप विद्यार्थ्यांमध्ये झाला.

विद्यार्थी संघटनेच्या महिला अध्यक्षेवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. आयशी घोष ही जेएऩयुच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आहे. अज्ञात हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले असल्याने त्याना ओळखता आले नाही.

ड़ाव्या संघटनेकडून या हल्ल्याचा अभाविपवर आरोप केला आहे.

माझ्यावर क्रूरतेने अज्ञात गुडांनी हल्ला केला. माझ्या नाकातोडांमधून रक्त येतय, असे आयशाने माध्यमांशी बोलतना सांगितलं.

फी वाढीच्या मुद्द्यावरुन जेएनयूचे शिक्षक आणि डाव्या संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. यादरम्यान हा सर्व प्रकार घडला.

https://twitter.com/JNUSUofficial/status/1213837806142775298

या अज्ञात हल्लेखोरांनी लाठ्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात शिक्षकांनाही मारहाण करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली गेली. यामध्ये गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.

या घटनेत जखमी झालेल्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या सर्व प्रकाराबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.

जेएनयुमधील घडलेल्या या प्रकारमुळे मी हैराण आहे. विद्यार्थ्यांवर हल्ला क्रूरपणे हल्ला केला आहे. पोलिसांनी तात्काळ हिंसा थांबावयला हवं.

जर विद्यापीठ परिसरात विद्यार्थी सुरक्षित नसतील तर, देश कसा विकास करेल, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number