कल्याणमध्ये सहाय्यक आयुक्तांवर हल्ला

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकावर एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाईट बंद करत शिवीगाळ करत पथकाला कांदे फेकून मारल्याची घटना एपीएमसी मार्केटमध्ये घडली आहे. या प्रकरणी तक्रार केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्लास्टिक बंदीबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत. दरम्यान […]

कल्याणमध्ये सहाय्यक आयुक्तांवर हल्ला

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकावर एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाईट बंद करत शिवीगाळ करत पथकाला कांदे फेकून मारल्याची घटना एपीएमसी मार्केटमध्ये घडली आहे. या प्रकरणी तक्रार केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

प्लास्टिक बंदीबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त एपीएमसी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यास गेले. यावेळी मार्केटमधील लाईट बंद करत या पथकाला शिवीगाळ करत कांदे फेकून मारले. यावेळी केडीएमसीच्या पथक तेथून निघून गेले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच आजच्या याप्रकरणाचा कामगार संघटनेच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number