हैदराबादमध्ये नुकताच पार पडलेला 'वाराणसी' चित्रपटाचा कार्यक्रम सध्या चर्चेत आला आहे. दक्षिण भारतातील लोकप्रिय चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांनी यानिमित्त हैदराबादमध्ये एका भव्य "ग्लोबेट्रोटर" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांच्या "वाराणसी" या चित्रपटाचे शीर्षक जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमात प्रियांका चोप्राच्या सौंदर्याने तिथे उपस्थित सगळ्यांना भूरळ पाडली. तिने पांढरा लेहेंगा घालू त्यावर साजेसे दागिने घातले होते. त्याचसोबत केसांमध्ये वेणी आणि कपाळावर बिंदी घालून तिचा लूक पूर्ण केला. ज्यात एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती. प्रियांका चोप्राच्या देसी लूकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्रियांका चोप्राने स्वतः या कार्यक्रमातील तिच्या लूकचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. यादरम्यान प्रियांका चोप्राच्या शेजारी बसलेले दक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता महेश बाबू तिच्याकडे पाहतच राहिले. यावेळी त्यांची नजर प्रियांका चोप्रावरुन हटतच नव्हती, ते एक टक लावून तिच्याकडे पाहत राहिले होते. ते पाहत असताना प्रियांका चोप्राने त्यांच्याकडे पाहून एक गोड स्माईल केली. त्यानंतर ते दोघेही हसत हसत गप्पा मारु लागले. दरम्यान 'वाराणसी' चित्रपटाच्या टायटल इव्हेंटमध्ये ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राच्या मनमोहक सौंदर्याने हा कार्यक्रम सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय बनला आहे.
प्रियांका चोप्रा महेश बाबू आणि एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित 'वाराणसी' चित्रपटात मंदाकिनीची भूमिका साकारताना दिसणार आहे. "वाराणसी" चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 2027 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात महेश बाबू 'रुद्र'ची भूमिका साकारणार आहेत आणि प्रियांका चोप्रा 'मंदाकिनी'ची भूमिका साकारत आहेत. चित्रपटातील अभिनेत्रीचा फर्स्ट लूक देखील समोर आला आहे, ज्यामध्ये ती पिवळी साडी परिधान करून आणि हातात बंदूक धरून अॅक्शन करताना दिसत आहे.
तसेच प्रियांका चोप्राने स्टेजवर तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि हैदराबादला तिचे दुसरे घर म्हटले. यावेळी प्रियांकाने प्रथम हात जोडून स्टेजवरील सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांचे स्वागत केले आणि नंतर म्हणाली, "ही अशी भूमी आहे जिथे मी परत आल्याचा खूप आनंद घेत आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीत काम करण्याचा सर्वात मजेदार भाग म्हणजे इंडस्ट्रीतील महान कलाकारांसोबत काम करणे." त्याचसोबत महेश बाबूचे कौतुक करत म्हणाली, "तुम्ही आणि तुमचे सुंदर कुटुंब, नम्रता आणि सितारा, यामुळे मला हैदराबाद माझे घर आहे असे वाटले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद."