Nashik BJP Vs Shivsena : नाशकात गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ

नाशिकच्या जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजनांकडून शिंदेंच्या शिवसेनेतील महानगरप्रमुखांवर व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Nashik BJP Vs Shivsena : नाशकात गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ

नाशिकच्या सिडकोतील गिरीश महाजनांच्या सभेनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून चांगलाच गोंधळ घालण्यात आला. नाशिकच्या जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजनांकडून शिंदेंच्या शिवसेनेतील महानगरप्रमुखांवर व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. व्हिडिओ दाखवण्यात आल्यानंतर संबंधित मुलांच्या पालकांकडून आणि शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांकडून गिरीश महाजनांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासर्व प्रकरणामुळे काही काळ गोंधळाच वातावरण निर्माण झालं. 

हेही वाचा- Devendra Fadnavis : ‘…तरीही मुंबईत मराठी माणूस संकटात का?’ फडणवीसांकडून देखील लाव रे तो व्हिडीओ म्हणत ठाकरेंना थेट सवाल
नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर सभेत नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यावर बिल्डरांना ब्लॅकमेल करत असल्याचा, तसेच नाशिकच्या ड्रग्स प्रकरणाशी प्रवीण तिदमे यांचा संबंध असल्याचा खळबळजनक गंभीर आरोप गिरीश महाजन यांनी केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर सभेत शिंदेंच्या शिवसेनेचं महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांचे ड्रग्स पेडलर तरुणांबरोबरचे व्हिडिओ दाखवत हा खळबळजनक दावा केला. महाजनांच्या या आरोपानंतर मात्र नाशिक मधलं वातावरण चांगलंच तापलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number