संकट नीट ओळखा मुंबई वाचली पाहिजे असं मनसे नेते राज ठाकरे यांनी ऑफ द रेकॉर्ड मनसेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून ठाकरे बंधुंनी युतीचे नारे दिले आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे जागावाटप झाले असून राज ठाकरेंकडून पहिला उमेदवार समोर आला आहे. याचपार्श्वभूमिवर राज ठाकरेंनी मेळाव्यात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना कानमंत्र दिला आहे.
मुंबई महानगपालिका निवडणुकीपुर्वी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षात युती झाल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. यांनतर आता राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या मनात मुंबई महानगपालिका निवडणुका लक्षात घेत मुंबई हातात घेण ज्यांच स्वप्न आहे, त्यांच स्वप्न उद्ध्वस्त करा असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे. भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम आहे त्याच्यावर ते माज करत आहेत, असं देखील राज ठाकरेंनी म्हटल आहे. पुढे मी सत्तेविना जरी राहिलो तरी आपला दबदबा कायम आहे, असं देखील सांगायला राज ठाकरे विसरले नाही आहेत.
हेही वाचा- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण e-KYCची मुदत पुन्हा वाढली, पण सोशल मीडियावर भलत्याच चर्चा
यावेळी राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, मुंबई वाचवण्यासाठी ती आधी आपल्याला हातात घ्यावी लागले. संकट नीट ओळखा, त्यांच स्वप्न उद्धवस्थ करा. इतके वर्ष सत्तेविना राहिलो आहे मात्र दबदबा कायम आहे. नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमवर भाजप माज करतो आहे. प्रचारादरम्यान सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे. कोणाला किती जागा मिळाल्या म्हणत नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हिता पुढे आपला स्वार्थ शुल्लक आहे. असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले आहेत.
या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. यावेळी दादरमधील मुंबई महापालिकेतील वार्ड क्रमांक 192 हा मनसेला देण्यात आला असून या वॉर्डमधून राज ठाकरेंच्या मनसेकडून मनसे नेते यशवंत किल्लेदार मुंबई महानगपालिकेची निवडणुक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटात नाराजीनाट्य सुरु झाले आहे.
यावेळी वॉर्ड क्रमांक 192 हा मनसेला देण्यात आल्यामुळे वॉर्ड क्रमांक 194 शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या. मात्र या निर्णयाने ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाखुश असल्याचं समोर येत आहे. वॉर्ड क्रमांक 192 शिवसेना ठाकरे गटाला मिळावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या भेटीला देखील गेले होते.