राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीचा प्रचार कालावधी पूर्वीपेक्षा एक दिवस वाढवण्यात आल्यानंतर आज शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचारासाठी उमेदवारांकडून जय्यत तयारी पाहायला मिळाली. दरम्यान उद्या म्हणजेच 2 डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. याचपार्श्वभूमिवर नाशिक येथील भगूरमधील प्रचारसभेत अजित पवार यांनी भाषणा वेळी असं काही तरी वक्तव्य केलं ज्यामुळे उपस्थित सर्व जण थक्क झाले.
यावेळी अजित पवारांनी म्हटल की, उद्याची पाच वर्ष तुम्ही कमळ मशाल आणि घड्याळ लक्षात ठेवा. तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला टोला देखील दिला आहे. एकनाथ शिंदे भगूर येथील सभेसाठी हेलिकॉप्टरने आले असता, त्यांच्या हेलिकॉप्टरमुळे कचरा उडाला होता. यावर अजित पवार यांनी ‘उद्या असे बटण दाबा जसा कचरा उडाला तस ही सगळे उडाले पाहिजे. मला आता व्हिडिओ दाखवला त्यात किती कचरा उडत होता’ असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
पुढे अजित पवार म्हणाले की, “आज शेवटचा दिवस मला अजून दोन सभा, प्रचाराला परवानगी दिली म्हणून मला येत आले… आम्ही सगळे जन शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करतो… इथे जी आम्ही आघाडी केली त्यात भाजप , राष्ट्रवादी ,आणि उबठा आहे… आम्ही स्थानिक लोकांना मुभा दिली… आम्ही सगळे जन महायुतीचे काम करतो आमच्या विरोधात शिवसेना आहे… आम्ही लाडकी बहीण माध्यमातून सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे… मी मघाशी भाषण ऐकत होता सरोज आहेर ला मी २०१९ पासून ओळखतो आज ती झाशीची राणी झाली होती हातात फक्त तलवार द्याची बाकी होती… सरोज हळवी आहे तिच्या डोळ्यात लगेच पाणी येते… माझ्या धाकट्या बहिणीला मी कधी नाराज केले नाही… इथला सावरकरांचा वाडा प्रेरणा स्थान आहे… आमचा उमेदवार कॉम्पुटर आहे, ती पुण्याची आमची कन्या इथली सुन आहे… तिचा मागे पराभव झाला मात्र ती खचली नाही… आता जबाबदारी माजी देवंद्र फडणवीस यांची आहे…”
“यंदा अनेक अडचणी आल्या शेतकरी अडचणीत आला… शेतकरी संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही ३३ हजार कोटींची मदत केली… आम्ही पुन्हा दिवाळी झाल्यावर ११ हजार कोटींचे पॅकेज दिले… एकूण ४४ हजार कोटींची मदत केली… बीड जिल्हा माझा मराठवाडा शेतकऱ्यांना आत्महत्येचा विचार देखील येऊ नये… या वेळी आम्ही नाशिक जिल्हा बँकेला मदत करण्याचे ठरवले आहे… मात्र पुढच्या निवडणुकीत ज्यांचे कारकीर्दीत बँक अडचणीत आली त्यांना पुन्हा निवडून देऊ नका… मी देखील बँकेचा चेअरमन झालो मग खासदार…”
“कशाचा वाद ,पहिल्यांदा तू घडयाळ मशाल आणि कमळाला मतदान कर… मी माझ्या बारामतीत काम केले तुम्ही निवडून द्या तोच विकास होईल… माझ्या कडे कितीपण हेलिकॉप्टर पाठवा कचरा उडत नाही… तुम्ही गुमानी रहा आम्ही गुमानी राहू कायदा हातात घ्यायचा नाही… माझ्या धाकट्या बहिणीचा बाप काढला… यशवंत चव्हाण यांनी काय शिकवले तुम्ही एका भाघिणीचा बाप काढता… तुम्हाला केंद्र सरकार आणि देवेंद्रजी आम्ही मदत करायला आहे… नियोजन खाते अर्थ खाते माझ्याकडे, मी फडणवीस यांना सांगितले तर, अजून तुमचा पालक मंत्री नाही मीच तुमचा पालकमंत्री आहे समजा… पुढच्या पाच वर्षाची कारकिर्द भाजप ,राष्ट्रवादी, उभाठा, उद्याची पाच वर्ष तुम्ही कमळ मशाल आणि घड्याळ लक्षात ठेवा…”