सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ

येवला तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय नारायण शिंदे यांना तीन हजाराची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ  पकडले असून या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. पोलीस स्थानकात दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात ४,०००/- रुपये लाचेची पोलीस अधिकाऱ्याने मागणी  करून त्यातील पहिला हप्ता रुपये ३,०००/- लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत […]

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ

येवला तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय नारायण शिंदे यांना तीन हजाराची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ  पकडले असून या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. पोलीस स्थानकात दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात ४,०००/- रुपये लाचेची पोलीस अधिकाऱ्याने मागणी  करून त्यातील पहिला हप्ता रुपये ३,०००/- लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांच्या पत्नीने येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या अदखलपात्र तक्रारीवरून समोरच्यावर कारवाई करण्यासाठी व तक्रारदार त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र तक्रार अर्जानुसार दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून चार हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता रुपये तीन हजार लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक शिंदे याला रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा अधिकारी लात लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, पोना राजेश गिते, पोना शरद हेंबाडे, पोना अनिल राठोड यांनी नाशिक परिक्षेत्राच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number