Assembly Special Session Adjourned: पावसाचा फटका विधानसभा विशेष बैठकीला; मंत्री गैरहजर, दोनवेळा कामकाज तहकूब

आयोजित करण्यात आलेली विधानसभा विशेष बैठक मंत्री उपस्थित नसल्याने दोनवेळा तहकूब करण्यात आली.

Assembly Special Session Adjourned: पावसाचा फटका विधानसभा विशेष बैठकीला; मंत्री गैरहजर, दोनवेळा कामकाज तहकूब

मुंबईतील मुसळधार पावसामुळे राज्याच्या विधीमंडळ कामकाजावर मोठा परिणाम झाला असून, आज आयोजित करण्यात आलेली विधानसभा विशेष बैठक मंत्री उपस्थित नसल्याने दोनवेळा तहकूब करण्यात आली.भाजप आमदार योगेश सागर यांनी मंत्री गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित करत तातडीने कामकाज थांबवण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी प्रथम पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केली. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच परिस्थितीत फारसा बदल न झाल्याने बैठक पुन्हा 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.

या वेळी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही नाराजी व्यक्त केली. "आमदार तीन-तीन तास प्रवास करून सभागृहात उपस्थित राहतात, मात्र एकही मंत्री उपस्थित नसणे योग्य नाही," असे त्यांनी सांगितले. त्यांनी किमान एक मंत्री तरी सभागृहात उपस्थित असावा, अशी मागणी केली.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक मंत्री सभागृहात पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे विधानसभेतील कामकाज विस्कळीत झाले असून, विरोधकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता आजची विधानसभा बैठक पावसाच्या फटक्यामुळे आणि मंत्री गैरहजेरीमुळे ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number