‘धर्म विचारून खरेदी करा’

पहलगाम येथे झालेला हल्ला हा आजवरच्या इस्लामी अतिरेकी हल्ल्यापेक्षा वेगळा आहे. या हल्ल्यात कुणी कितीही नाकारू पीडित टाहो फोडून सांगतायत की, धर्म विचारून अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांची हत्या केली.

‘धर्म विचारून खरेदी करा’

मुंबई : पहलगाम येथे झालेला हल्ला हा आजवरच्या इस्लामी अतिरेकी हल्ल्यापेक्षा वेगळा आहे. या हल्ल्यात कुणी कितीही नाकारू पीडित टाहो फोडून सांगतायत की, धर्म विचारून अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांची हत्या केली. या घटनेचा समाजमनावर खोलवर परिणाम झालाय हिंदू असणे गुन्हा आहे का इथपासून हिंदूंनी एकत्र यायचे कसे असा सवाल वारंवार विचारला जात आहे. त्याच्या उत्तरादाखल हिंदू व्यावसायिकांच्या एकत्रीकरणाची मोहीम जोर धरू लागली आहे. 

धर्म विचारूनच वस्तू खरेदी करा असे वक्तव्य मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. सुनील तटकरे यांचा राणेंच्या वक्तव्याला विरोध असून नितेश राणेंचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर हिंदू एकत्रीकरणाच्या बाबत सामाजिक हालचाली होताना दिसत आहेत. धर्म बघूनच वस्तू खरेदी करा असे राणेंनंतर आमदार अनुप अग्रवालांनीही आवाहन केले आहे. 

हेही वाचा : Pahalgam Attack: वेचून वेचून ठेचून काढणार

मुळात हिंदूंनी एकत्र येण्याची गरज ही मुसलमानांच्या एकत्रीकरणामुळे निर्माण झाली आहे. मुसलमान व्यावसायिकांचे एकत्रीकरण हा मुद्दा हलाल प्रमाणीकरण म्हणून भारतात बळजबरीने राबवला जात आहे. हलाल प्रमाणपत्राच्या बळजबरी मागे षड्यंत्र काय आहे समजून घ्या…

इस्लामी अर्थव्यवस्था म्हणजे हलाल अर्थव्यवस्था
हलाल अर्थव्यवस्थेनं गाठलाय 2 ट्रिलियन डॉलरचा टप्पा
इस्लामिक देशात वस्तू निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्र अनिवार्य
हलाल अर्थव्यवस्थेतून मिळालेला पैशांचा वापर जिहादी कारवायांसाठी
हलाल प्रमाणपत्र देण्याचा अधिकार खासगी इस्लामी संस्थांना का?

हिंदूंनी हिंदूंकडूनच माल खरेदी करावा. हिंदूंनी आर्थिक संबंध हिंदूंशीच ठेवावेत या भूमिकेतून सांगलीत आर्थिक चळवळ उभी राहली आणि त्याचे विशेष फायदे हिंदू व्यावसायिकांना मिळू लागले आहेत. सांगलीत उभी राहिलेली ही मोहीम सुरुवातीला अडखळली पण आता तिने जोम धरलाय. हिंदू व्यावसायिकांच्या एकत्रीकरणासाठीची ही चळवळ राज्यभरात पसरू शकते असा विश्वास आयोजकांना वाटत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number