Ashok Kharat Case : खरातची बातमी छापल्यानंतर रुपाली चाकणकरांचा मला फोन; पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

अहिल्यानगर : सध्या राज्यात कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत आहे. ज्योतिष विद्येच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबाचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे. या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील खबरदार पुढारी या स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता “कॅप्टन भोंदूबाबा” या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते. अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक […]

Ashok Kharat Case : खरातची बातमी छापल्यानंतर रुपाली चाकणकरांचा मला फोन; पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

अहिल्यानगर : सध्या राज्यात कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत आहे. ज्योतिष विद्येच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबाचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे. या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील खबरदार पुढारी या स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता “कॅप्टन भोंदूबाबा” या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते. अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करायला लावते, अशी धमकीच रुपाली चाकणकर यांनी दिल्याचा आरोप खेमनर यांनी केला आहे. तसेच महिला आयोगाकडून ‘स्यु-मोटो’ गुन्हा दाखल करण्यासाठी चाकणकर यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिल्याचा दावाही खेमनर यांनी केला आहे. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारणामे माहीत नव्हते का?, असा प्रश्न उपस्थित होतो. 

हेही वाचा : Ashok Kharat Case: भोंदू बाबा खरातचं ‘बिंग’ कसं फुटलं? पाच कोटींची खंडणी, सीसीटीव्ही फुटेज आणि तो ऑफिस बॉय, काय घडलं नेमकं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number