Chhagan Bhujbal: ‘तपासातून सत्य समोर येईलच’; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांनी चौकशीच्या मुद्द्यावर दिले महत्त्वाचे संकेत

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Chhagan Bhujbal: ‘तपासातून सत्य समोर येईलच’; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांनी चौकशीच्या मुद्द्यावर दिले महत्त्वाचे संकेत

नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या खरातचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सध्या त्याची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे.

तपासादरम्यान या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात नाव चर्चेत आल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Anjali Damania: ‘राजकारणी नको, IPS किंवा निवृत्त न्यायाधीशांना आयोगाचे अध्यक्ष बनवा…’; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांची मागणी

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भुजबळ म्हणाले की, “रुपाली चाकणकर यांनी काही चुकीचे केले असेल तर ते तपासातून समोर येईल आणि पोलिस त्याची योग्य चौकशी करतील.”

ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येत नाही, तोपर्यंत अनेक जण शांत राहतील. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या पीडित महिला तपास यंत्रणांना माहिती देतील आणि त्यातून सत्य समोर येईल.”

रुपाली चाकणकर यांच्याविरोधात पक्षाकडून कोणती कारवाई करायची, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याही यासंदर्भात निर्णय घेतील, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात, रुपाली चाकणकर यांच्यावर कोणती कारवाई होते आणि अशोक खरातला पुढे कायदेशीररित्या कोणत्या कारवाईला सामोरे जावे लागते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ‘Wait and Watch…’ रोहिणी खडसेंचा जळजळीत इशारा; रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण तापले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number