राज्यात सध्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्य करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान अशोक खरात विरोधात तक्रारदारांचा आकडा वाढत चालला आहे. दरम्यान पोलिसांना सुमारे 58 अश्लील आणि अघोरी कृत्यांचे व्हिडिओ मिळाल्याची माहिती होती. मात्र त्याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती नाशिकमध्ये पार पडलेल्या SIT च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी दिली आहे.
महिलांवर तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याच्यार आणि अश्लील कृत्ये केल्याचे खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकदा खरात प्रकरणावर मीम्सच्या माध्यमातून विनोद व्हायरल करत असताना अनेकांकडून त्यासंबंधी व्हिडिओ फोटोमध्ये खरातसमोबत असलेल्या पीडितांचे चेहरे देखील व्हायरल होत होते. यामुळे त्या महिलांची बदनामी होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे पीडितांच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कंटेंटला शेअर किंवा फॉरवर्ड करू नये असं आवाहन देत पोलीस अॅक्शन मोडमध्ये आहेत.
हेही वाचा- Vijay Wadettiwar On Ashok Kharat Case : "ते पेन ड्राईव्ह समोर आलं तर…" खरातप्रकरणी वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
दरम्यान भोंदूबाबा खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत, कोपरगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेचे कलम 294 ( 2 ), 3 ( 5 ) आणि माहिती तंत्रज्ञान 2000 चे कलम 67 ( अ ) नुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान राहुल शिंदे आणि योगेश आढावा असं या दोन मुलांची नाव असून कोपरगाव येथील या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अशोक खरात प्रकरणात पीडितांचे फोटो, व्हिडिओ किंवा त्यांची ओळख उघड करणारा कोणताही मजकूर व्हायरल केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.