Ashok Kharat Case: ‘माझ्या बहिणींनी भूलथापांना बळी पडू नये’; नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके कडाडल्या

अडके यांनी या प्रकरणात पीडितांना न्याय मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. “अशा भोंदू प्रवृत्तींना योग्य शिक्षा देण्यासाठी आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे,” असे त्या म्हणाल्या.

Ashok Kharat Case: ‘माझ्या बहिणींनी भूलथापांना बळी पडू नये’; नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके कडाडल्या

नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महिलांशी अमानवी आणि अश्लील कृत्ये केल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून नाशिकसारख्या सुसंस्कृत शहराच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, अशोक खरातने केलेली कृत्ये ही मानवतेला काळिमा फासणारी असून महिलांविषयी अनादर दाखवणारी आहेत. “भोंदू प्रवृत्ती ही समाजासाठी घातक असून अशा प्रवृत्ती म्हणजे समाजातील विकृती आहे,” असेही त्यांनी सांगितले.

अडके यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणामुळे नाशिकचे नाव राज्यभर चर्चेत आले आहे, मात्र ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. नाशिकची सांस्कृतिक ओळख खराब करण्याचे काम अशा प्रकारच्या कृत्यांमुळे झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Edible Oil Price: आखातातील युद्धामुळे 15 दिवसांत बदलले तेलाचे दर, नागरिकांच्या खिशाला कात्री

महिलांना सजग राहण्याचे आवाहन

पत्रकारांशी संवाद साधताना हिमगौरी अडके यांनी विशेषतः महिलांना सावध राहण्याचे आवाहन केले. “कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याबाबत सतर्क राहा,” असे त्या म्हणाल्या. “नाशिकची प्रथम नागरिक म्हणून मी सर्वांना आवाहन करते की, विशेषतः माझ्या बहिणींनी कोणत्याही भोंदूगिरीला बळी पडू नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायव्यवस्थेवर विश्वास

अडके यांनी या प्रकरणात पीडितांना न्याय मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. “अशा भोंदू प्रवृत्तींना योग्य शिक्षा देण्यासाठी आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे,” असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जात आहे, तसतसे नवे खुलासे समोर येत आहेत. नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत असून अशोक खरातला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

एकूणच, या प्रकरणामुळे नाशिक शहराची प्रतिमा मलिन झाली असून पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Amit Shah Plane Landing : गृहमंत्र्यांच्या बंगाल दौऱ्याच्या सुरुवातीलाच विघ्न…, वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटामुळे विमानाचं लँडिंग….

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number