‘भाजपाकडून ईडी, सीबीआय, या चौकशी संस्थांचा गैरवापर’ – अशोक गहलोत

भाजप सरकारकडून न्याय व्यवस्था, ईडी, सीबीआय, आयकर विभाग, या चौकशी संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जळगाव येथे केला आहे. जाणूनबुजून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष केले जात आहे. प्रत्येक राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम त्रास देण्याचा भाजपचा उद्योग सुरू आहे. शरद पवार, पी. चिदंबरम यांचे उदाहरण समोर आहे. असे गेहलोत यांनी […]

‘भाजपाकडून ईडी, सीबीआय, या चौकशी संस्थांचा गैरवापर’ – अशोक गहलोत

भाजप सरकारकडून न्याय व्यवस्था, ईडी, सीबीआय, आयकर विभाग, या चौकशी संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जळगाव येथे केला आहे. जाणूनबुजून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष केले जात आहे. प्रत्येक राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम त्रास देण्याचा भाजपचा उद्योग सुरू आहे. शरद पवार, पी. चिदंबरम यांचे उदाहरण समोर आहे. असे गेहलोत यांनी म्हटले आहे.

राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. जळगावातील गांधीतीर्थ भेट आणि सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील जैन इरिगेशन कंपनीच्या विविध प्रकल्पांच्या पाहणीसाठी गेहलोत दोन दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

त्यावेळी भाजप सरकार न्यायव्यवस्था, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या चौकशी संस्थांचा गैरवापर करीत आहे. यामुळे संपूर्ण देश चिंतीत आहे. जाणूनबुजून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष केले जात आहे. प्रत्येक राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्याचा उद्योग सुरू आहे. असा आरोप त्यांनी केला असून शरद पवार, पी. चिदंबरम यांचे उदाहरण डोळ्यासमोर असल्याचे त्यांनी म्हटले आहे

गेल्या पाच वर्षात एकही भाजप नेत्याविरुद्ध ईडी किंवा सीबीआयची चौकशी लागली नाही. तसेच छापा सत्रही भाजप नेत्यांवर राबवले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. देशात अश्या प्रकारे अराजक माजत असली तरी काँग्रेससह सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपला एकजुटीने सडेतोड उत्तर देऊ, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number