विधानसभा निवडणुका काही दिवसांवर ठेपल्या असून राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. काही ना तिकीट मिळाले तर काही ना नाही त्यामुळे अनेक राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. भाजपाचे दिग्गज नेते विनोद तावडे यांचे भाजपाच्या कुठल्याच यादीत नाव नसल्यामुळे त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे विरोधकांनी प्रचंड टीका केली आहे. मला निवडणूक लढू नये असा सल्ला देणाऱ्यांना तिकीट मिळाले नसल्याचे अशी मिश्किल टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण ?
मला निवडणूक लढू नका म्हणाऱ्यांनाच पक्षाने तिकीट दिले नसून नावात विनोद असल्याने त्यांचाच विनोद झाला असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
दक्षिण मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार मोहन हंबर्डे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत अशोक चव्हाणांनी विनोद तावडेंवर मिश्किल टीका केली.
विनोद तावडेंचे नाव आतापर्यंत भाजपाच्या यादीत लागले नसल्यामुळे नाराज झाले आहेत.
काय आहे अशोक चव्हाण आणि विनोद तावडेंमधला वाद ?
अशोक चव्हाणांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये, नाही तर पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती होणार असल्याचा सल्ला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला.
विनोद तावडे यांनी दिलेल्या सल्ल्यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मला फुकटच्या सल्ल्याची गरज नसून तुमच्या पक्षातील इच्छुकांना हा सल्ला द्या.
तसेच अनेकांच्या कोपराला तुम्ही गुळ लावून ठेवला असून बंडखोरी होणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहे.
भाजपाला माझी भीती वाटत असून भीती पोटी असे विधान करत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये नाही तर लोकसभेची पुनारवृत्ती होणार असल्याचे असा सल्ला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे.