‘मुंबईतल्या सर्व लँड स्कॅमचे बादशाह उद्धव ठाकरे’;आशिष शेलारांचा घणाघात

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.शेलार यांनी उद्धव ठाकरेंना थेट 'मुंबईतील सर्व लँड स्कॅमचे बादशाह' असं संबोधून खळबळ उडवून दिली आहे.

‘मुंबईतल्या सर्व लँड स्कॅमचे बादशाह उद्धव ठाकरे’;आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई: राजकारणात पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपने गरवारे क्लब येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलताना शेलार यांनी उद्धव ठाकरेंना थेट 'मुंबईतील सर्व लँड स्कॅमचे बादशाह' असं संबोधून खळबळ उडवून दिली आहे. एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, यात शेलार यांचा हल्लाबोल ऐकायला मिळतो. तथापि, ‘जय महाराष्ट्र’ या क्लिपची पुष्टी करत नाही.

या कार्यशाळेत शेलार म्हणाले, 'उद्धव ठाकरेंच्या डोक्यात नेहमी लँड आणि लँड स्कॅमचं गणित सुरू असतं. मुंबईतील अनेक जमीन व्यवहारांमध्ये गोंधळ झाला असून, त्याचे थेट धागेदोरे ठाकरे गटाशी संबंधित आहेत. त्याचे थेट धागेदोरे ठाकरे गटाशी संबंधित आहेत.' या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.राजकारणात विरोधकांवर आरोप करणे नवीन नाही, पण ‘लँड स्कॅमचे बादशाह’ असा उल्लेख केल्यामुळे शेलार यांची ही टीका अधिक तीव्र मानली जात आहे. 

या सर्व घडामोडीवर ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ऑडिओ क्लिपची प्रामाणिकता सिद्ध न झाल्यामुळे यावर राजकीय वर्तुळात मतमतांतरे आहेत. काही जण याला 'राजकीय स्टंट', तर काही जण 'गंभीर आरोप' मानत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number