खासदार ओवैसीला पॅलेस्टाईनच्या मुसलमानांची चिंता

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ओवैसी यांनी 'जय पॅलेस्टाईन' अशी घोषणा दिली

खासदार ओवैसीला पॅलेस्टाईनच्या मुसलमानांची चिंता

नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM / एआयएमआयएम) अर्थात अखिल भारतीय मुसलमान एकता संघ या पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ओवैसी यांनी 'जय पॅलेस्टाईन' अशी घोषणा दिली. हे कृत्य करून ओवैसी यांनी भारताचा खासदार असूनही पॅलेस्टाईनच्या मुसलमानांची चिंता करत असल्याचे दाखवून दिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ओवैसी यांचे कृत्य योग्य की अयोग्य यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number