Tukaram Mundhe : 53 धाडी, 33 जण अटकेत अन् 4 मोठ्या कारवाया…; FDA आयुक्त पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’वर

तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच नागपूर एफडीएकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe : 53 धाडी, 33 जण अटकेत अन् 4 मोठ्या कारवाया…; FDA आयुक्त पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’वर

आपल्या कर्तव्यकठोर आणि शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे 'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासनया संवेदनशील विभागात बदली करण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच नागपूर एफडीएकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर आस्थापनांना कडक इशारा देत प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केला आहे. ही धडक कारवाई करत भेसळीचा संशय असलेला सुमारे 4.72 लाखांचा खाद्यपदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा- Fishing Ban: ठाणे-पालघर मच्छीमारांसाठी मोठी बातमी! 1 जूनपासून समुद्रात मासेमारी बंद; नियम तोडल्यास होणार कारवाई

34 हजार 800 रुपये किमतीचा 1हजार 196 किलो हळद आणि मिरची पावडर जप्त करण्यात आले. याशिवाय 54 हजार 180 रुपये किमतीचे चार हजार सहाशे लिटर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर देखील जप्त करण्यात आले आहे. 58,260 रुपये किमतीचे 194 किलो क्रीम, 19200 रुपये किमतीचे 64 किलो पनीर आणि सहा हजार 130 रुपये किमतीचे पंचवीस किलो इतर खाद्यपदार्थाचे नमुनेही तपासणीसाठी जप्त करण्यात आले. नमुने प्रयोग शाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार

यावेळी मुंबई विभागात 19 आस्थापनांना तडकाफडकी सील करून झडती घेण्यात आली. त्याचसोबत 19 व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये 40,960 रूपयांचे निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त करण्यात आले असून धाराशिवमधून 47,300 रुपये किंमतीचा खवा जप्त केला आहे. पुण्यातून रसायनांचा वापर करून पिकवलेले 20,000 रुपये किंमतीचे 800 किलो आंबे जप्त केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number