काँग्रेस प्रवक्ते अरुण सावंत शिंदे गटात

शिवसेनेनंतर आता काँग्रेसलाही धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा देत कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. सावंत यांनी मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. अरुण सावंत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला विभागातील युवासेना तसेच पालघर, विक्रमगड, खालापूर, दहिसर, चांदीवली येथील शिवसेना, काँग्रेस आणि […]

काँग्रेस प्रवक्ते अरुण सावंत शिंदे गटात

शिवसेनेनंतर आता काँग्रेसलाही धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा देत कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. सावंत यांनी मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. अरुण सावंत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला विभागातील युवासेना तसेच पालघर, विक्रमगड, खालापूर, दहिसर, चांदीवली येथील शिवसेना, काँग्रेस आणि मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. याबाबत काही फोटो देखील शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ५८ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला होता.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय वातावरणात भाजप नेत्याने केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आजी-माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळेही चर्चांना उधाण आले. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप येणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत असं काही होणार नसल्याचं म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number