मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेत चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. आम्ही धर्माचे राजकारण करत नाही तसेच कलम 370 दहशतवादाची जननी असल्याचेही अमित शाह म्हणाले आहे.
जम्मू काश्मीरचे लोक स्वांतत्र्यानंतर गरीबीत जगत आहेत.
कलम 370 जम्मू- काश्मीरच्या विकासासाठी बाधक आहे.
कलम 370 गरीब, आदिवासी, दलित विरोधी कलम तेच दहशतवादाचं मूळ आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत निवडणूका होत नव्हत्या आणि काश्मीर खोऱ्यात केवळ मुस्लीम राहत नाहीत.
हिंदू, मुस्लीम, शिख, बौध्द सर्वजण राहतात.
आम्ही धर्माचं राजकारण करत नाही असे अमित शाह म्हणाले.
जम्मू-काश्मीरला मोदींनी 2 लाख 77 हजार कोटी रुपये दिले आहेत.
काश्मीरी लोकांना प्रति व्यक्ती 14000 रुपये दिले.
मात्र विकास झाला नाही कारण भ्रष्ट्राचार रोखू शकत नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये आत्तापर्यंत तीन परिवारांचा आशीर्वाद असणारेच उद्योग करु शकत.
जम्मू-काश्मीर बँकेत भ्रष्ट्राचार झाला.
जम्मू-काश्मीर मध्ये जमीनीचे दर वाढले नाही कारण इथे जमीन खरेदी करु शकत नाही.
कलम 370 मुळे लोक गरीब झाले.
शेकडो कोटी रुपये भ्रष्ट्राचारात स्वाहा झालेत.
जम्मू-काश्मीर मध्ये एकही चांगल हॉटेल नाही.
जम्मू-काश्मीर मध्ये पर्यटनाला अप्रत्यक्षपणे बंदी आहे.
कलम 370मुळे पर्यटनाला चालना नाही तसेच त्यामुळे रोजगार निर्माण होत नाही.
सर्व राज्ये देशात एकरुप झालेत असूनही राज्यांची भाषा, संस्कृती नष्ट झाली का?
चांगले डॉक्टर्स जम्मू काश्मीरला जात नाही त्यामुळे आरोग्य व्यवस्था ढासळली आहे.
काश्मीरात शिक्षणाचा अधिकार नाही.
काश्मीरच्या मुलांना शिक्षणाची गरज नाही का? असा प्रश्न उपस्थितीत केला.
राज्यात खासगी शिक्षण संस्था नाही.
संसदेचे कायदे जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नाही.
जम्मू-काश्मीरात ओबीसी , दलितांना राजकीय आरक्षण मिळत नाही.
काश्मीर खोऱ्यात 41 हजारांपेक्षा जास्त लोक मारले गेले.
कुणाच्या पॉलीसीमुळे हे लोक मारले गेले? या मृत्यूला जबाबदार कोण ? असे प्रश्न उपस्थित केले.
कलम 370मुळे जम्मू काश्मीर राज्यात दहशतवाद फोफावला आहे.
इतर राज्यातले तरुण दहशतवादाच्या मार्गावर का जात नाही?
कलम 370 मुळे काश्मीरी तरुण दहशतवादाच्या मार्गावर.
सर्व फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशात शिकतात.
मात्र खोऱ्यातील तरुणांना त्यांना अशिक्षित ठेवतात.
काश्मीर आम्हाला संपन्न बनवायचंय.