Arjun Tendulkar: सचिनच्या मुलावर पैशांचा पाऊस! अर्जुन तेंडुलकरवर तब्बल इतक्या लाखांची बोली; कोणत्या संघाने दिली संधी?

मुंबई टी-20 लीग लिलावात अर्जुन तेंडुलकरला मोठी मागणी मिळाली.

Arjun Tendulkar: सचिनच्या मुलावर पैशांचा पाऊस! अर्जुन तेंडुलकरवर तब्बल इतक्या लाखांची बोली; कोणत्या संघाने दिली संधी?

Arjun Tendulkar: मुंबईतील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल 2026 चा थरार सुरू असतानाच मुंबई टी-20 लीगच्या लिलावात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यावर मोठी बोली लागली. अर्जुनला ‘आर्क्स अंधेरी’ संघाने तब्बल 10 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले आहे. त्याची मूळ किंमत 2 लाख रुपये होती, मात्र लिलावात त्याच्यासाठी चांगली स्पर्धा पाहायला मिळाली.

2 लाखांवरून थेट 10 लाखांपर्यंत झेप

मुंबई टी-20 लीगच्या चौथ्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात अर्जुन तेंडुलकर हा चर्चेचा विषय ठरला. त्याची बेस प्राईज फक्त 2 लाख रुपये होती. मात्र काही संघांनी त्याच्यावर रस दाखवल्यानंतर बोली वाढत गेली आणि अखेरीस ‘आर्क्स अंधेरी’ संघाने 10 लाख रुपये मोजत त्याला आपल्या संघात सामील केले.

हेही वाचा: DC Vs RR IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचा ऐतिहासिक 'महाविजय'! राजस्थानचे 226 धावांचे आव्हान धूळीस मिळवत रचला नवा इतिहास

गोव्याकडून खेळतो, तरी मुंबई लीगमध्ये कसा?

अर्जुन तेंडुलकर सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मुंबईच्या स्पर्धेत तो खेळू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र बीसीसीआयच्या विशेष नियमामुळे त्याचा मार्ग मोकळा झाला. नियमांनुसार, आयपीएल वगळता एखादा खेळाडू 12 महिन्यांच्या कालावधीत एका अधिकृत राज्यस्तरीय टी-20 लीगमध्ये खेळू शकतो. जर त्याने मागील वर्षभरात कोणत्याही दुसऱ्या राज्यातील लीगमध्ये भाग घेतला नसेल, तर त्याला दुसऱ्या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. अर्जुनने गेल्या वर्षभरात कोणतीही राज्य टी-20 लीग खेळली नव्हती. त्यामुळे तो मुंबई लीगसाठी पात्र ठरला.

आयपीएलमध्ये संधी नाही, आता मोठी परीक्षा

अर्जुन सध्या आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. ट्रेडद्वारे त्याला संघात घेतले असले तरी अद्याप त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे मुंबई टी-20 लीग त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मानली जात आहे.

हेही वाचा: Vaibhav Sooryavanshi : विकेट घेतल्यानंतर 15 वर्षांच्या वैभवला डिवचणं पडलं महागात; 6.8 फुटांच्या जेमिसनला 'तो' अतिआक्रमकपणा भोवला

जूनमध्ये रंगणार मुंबई लीग

मुंबई टी-20 लीगचा चौथा हंगाम आयपीएल संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या लिलावात पुरुष आणि महिला विभागातील एकूण 2,411 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्थानिक क्रिकेटपटूंनाही या स्पर्धेमुळे मोठे व्यासपीठ मिळणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number