म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सुरु

मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण घराची किंमतच एवढी महाग असते की घर घेणं खिशाला परवडत नाही. त्यामुळे अनेकांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. परंतु, म्हाडामुळे हे स्वप्न साकार होणार आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फ ४,०८३ घरांच्या सोडतीसाठी आज, २२ मेपासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे. […]

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सुरु

मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण घराची किंमतच एवढी महाग असते की घर घेणं खिशाला परवडत नाही. त्यामुळे अनेकांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. परंतु, म्हाडामुळे हे स्वप्न साकार होणार आहे.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फ ४,०८३ घरांच्या सोडतीसाठी आज, २२ मेपासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे. म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी नोंदणी, कागदपत्रे सादर करणे, पात्रता निश्चिती, ऑनलाइन सोडत वितरण आणि घरांच्या रकमेचा भरणा अशी सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहेत.घरांची सोडत १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रेतील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे.

गेल्या काही वर्षापासून सामान्य मुंबईकराचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत आहे. म्हाडाकडून मुंबईकरांना स्वस्तात आणि चांगली घरे दिली जात आहे. यावेळीही म्हाडाने घरांची सोडत काढली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ४ हजार ८३ घरांची सोडत म्हाडा काढणार असून आता सामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

म्हाडा विविध उत्पन्न गटासाठी ४०८३ घरांची सोडत काढणार आहे. येत्या २२ मे पासून या घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरणे आणि स्वीकृतीला २२ मे रोजी दुपारी ३ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घरांची सोडत काढली जाणार आहे. १८ जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात ही सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number