नांदेडमधील आणखी एक एसटी कर्मचारी जीवाला मुकला

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याच्या मागणीसीठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलना दरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटनाही राज्यात घडली आहे. अशातच नांदेडमध्ये आंदोलक एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यी घटना समोर आली आहे. नांदेडमधील विठ्ठलराव वीर या मृत आंदोलककर्त्यांचे नाव आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात विठ्ठलराव यांनीही सहभाग घेतला होता. आंदोलन करताना […]

नांदेडमधील आणखी एक एसटी कर्मचारी जीवाला मुकला

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याच्या मागणीसीठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलना दरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटनाही राज्यात घडली आहे. अशातच नांदेडमध्ये आंदोलक एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यी घटना समोर आली आहे.

नांदेडमधील विठ्ठलराव वीर या मृत आंदोलककर्त्यांचे नाव आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात विठ्ठलराव यांनीही सहभाग घेतला होता. आंदोलन करताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सरकार आणखी किती बळी घेणार? असा संतप्त सवाल आंदोलक कर्मचारी करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number