पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या पुणे महामेट्रोच्या यशस्वी वर्षपूर्ती निमित्त पुणेकर व युवासेनेचे वतीने कर्वे रस्ता स्थानक येथे मेट्रो परिवार प्रती कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रवाशांच्या उपस्थितीमध्ये चालत्या मेट्रो मध्ये बालकाच्या हस्ते केक कापून हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे आणि पदाधिकारी यांनी केले.
यावेळी राम तोरकडी, विजय कणसे, निलेश पोळ, गणेश राठोड व प्रवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना निलेश गिरमे म्हणाले की, पुणे मेट्रो सिटी होण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल खरोखर प्रगतीचे पाऊल आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या मुळेच पुण्याचा विकास होणार आहे असा विश्वास आम्हाला आहे. या आगळ्या वेगळ्या वर्धापन दिनाचे नागरिकांनी कौतुक केले.