अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केले. “रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल अशोक खरातला झाले आहेत. तसेच त्यांच्या बहिणीचेही 236 कॉल खरातला झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17कॉल्स अशोक खरतला झाले होते”, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दमानियांना सीडीआरचा कुठून मिळाला? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला आता अंजली दमानिया यांनी उत्तर दिलं.
त्या म्हणाल्या की, सुषमाताई तुमचा व्हिडिओ पाहिला. प्रथमतः ह्या प्रकरणात मी DG श्री सदानंद दाते ह्यांची वेळ मागितली आहे. तुम्हाला काळजी नसावी. आता तुमच्या व्हिडीओबद्दल, तुम्हाला फक्त माझ्या विरुद्ध बोलायला फार आवडत असेल. मुद्द्यावर बोलण्याऐवजी माझ्यावर इतका राग? पण विषय फार गंभीर आहे, माझ्याविरुद्धची लढाई दुसऱ्या दिवशीसाठी ठेवा. मी तुमच्याशी कुठल्याही स्पर्धेत नाही”.
हेही वाचा – Jay Pawar: ‘बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवार साहेब प्रयत्न करतायत….’; जय पवार यांचे मोठे विधान
नंतर त्यांनी लिहिले की, “खरंतर तुम्हाला काळजी ह्या गोष्टीची वाटायला हवी होती की, उपमुख्यमंत्र्यांनी 17 कॉल का केले? ते 21मिनिट काय बोलले ? ते सत्तेत आहेत, मी नाही. तसेच, रुपाली चाकणकरांनी 177 कॉल का केले? चौकशी व्हायला नको ? , त्याचप्रमाणे, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, संजय शिरसाठ , दीपक लोंढे आणि मिलिंद नार्वेकर ह्यांची चौकशी कधी होणार?”
पुढे त्यांनी लिहिले की, “काय संबंध होते ह्या सगळ्यांचे ? मी ह्या मुद्द्यावर बोलते, त्या मुद्द्यावर नाही…. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी प्रत्येक मुद्द्यावर बोलत नाही. कारण आयुष्यात कुटुंब, मित्र, आणि इतर जबाबदाऱ्या आहेत. पण जेव्हा एखादा मुद्दा हातात घेते, तेव्हा पूर्ण ताकदीने लढते. फक्त बोलत राहत नाही”. आता अंजली दमानियांच्या या पोस्टला सुषमा अंधारे काय उत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुषमाताई तुमचा व्हिडिओ पाहिला. प्रथमतः ह्या प्रकरणात मी DG श्री सदानंद दाते ह्यांची वेळ मागितली आहे. तुम्हाला काळजी नसावी. आता तुमच्या व्हिडिओ बद्दल…… तुम्हाला फक्त माझ्या विरुद्ध बोलायला फार आवडत असेल. मुद्द्यावर बोलण्या ऐवजी माझ्यावर इतका राग? पण विषय फार गंभीर आहे,… pic.twitter.com/kIU1GYDJPE — Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 5, 2026