Anjali Damania on Parth Pawar : अंजली दमानियांचा जमीन घोटाळ्यावरून पार्थ पवारांवर पुन्हा निशाणा, आता थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारले प्रश्न

याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच संतापल्या आहेत. 

Anjali Damania on Parth Pawar : अंजली दमानियांचा जमीन घोटाळ्यावरून पार्थ पवारांवर पुन्हा निशाणा, आता  थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारले  प्रश्न

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार आणि नियमांना बगल देऊन केलेली खरेदी वादात सापडली आहे. यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे अडचणीत आले आहेत. आता याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच संतापल्या आहेत. 

त्यांनी खरगे समितीच्या अहवालाचा दाखला देत पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी भोंदू अशोक खरात याच्या परदेश वारीविषयी सुद्धा मोठा खुलासा केला आहे. अमेडिया कंपनी दोषी आहे, असं अहवालात म्हटले आहे. समितीच्या अहवालात म्हटले आहे की अमेडिया कंपनी ही या व्यवहारात दोषी आहे, फौजदारी कारवाई करण्यासाठी प्रकरण गृह विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. 

याप्रकरणात, आता कारवाईची अपेक्षा फडणवीस यांच्याकडून आहे. विकणारी आणि विकत घेणारी व्यक्ती दोन्ही दोषी आहेत असं समितीचे म्हणणं आहे. सरळ सरळ पार्थ पवार यांचं नाव घेण्यात आले आहे. 

आता कोणी त्यांना वाचवू शकणार नाही. फौजदारी कारवाई झालीच पाहिजे. गुन्हा नोंद झाला पाहिजे. दिग्विजय यांची 1 टक्क्याची भागीदारी आहे. बाकी 99 टक्के भागेदारी पार्थ पवार यांची आहे. त्यामुळे आता कारवाई झाली पाहिजे. कोणीही वाचवू शकणार नाहीत असे अंजली दमानिया म्हणाल्या. आता जर मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, अथवा त्यांना पाठीशी घातले गेले तर हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number