Anjali Damania : अजितदादांचा अपघात आणि ‘त्या’ दोन दिवसांत खरातला 36 मेसेज! दमानियांचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

6 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि खरात प्रकरणासंबंधी हदरवणारी माहिती दिली आहे.

Anjali Damania : अजितदादांचा अपघात आणि ‘त्या’ दोन दिवसांत खरातला 36 मेसेज! दमानियांचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे स्वतःचे’भविष्य’ सध्या अंधारात आहे. खरातच्या चौकशीदरम्यान दररोज नवीन काही तरी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आता भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एन्ट्री घेतली असून त्या देखील या प्रकरणासंबंधी अनेक माहिती समोर आणत आहेत. अंजली दमानिया यांनी या प्रकरणात थेट कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) समोर आणल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांशी त्याचा अत्यंत जवळचा संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

6 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि खरात प्रकरणासंबंधी हदरवणारी माहिती दिली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार आणि नेते रोहित पवार हे त्यांच्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी अनेक पुरावे माध्यमांसमोर मांडत आहेत. अशातच अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी खरातला 17 मेसेज गेल्याचा गंभीर दावा केला आहे. 

हेही वाचा- Sharad Pawar: ‘राजकारणात परिपक्वता लागते, ती पार्थ पवार यांच्यात…’; शरद पवारांचा सूचक टोला?
यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या की, “समता नावाची एक पतसंस्था आहे. ज्याची सध्या चौकशी सुरू आहे. त्या पतसंस्थेतून अजित पवार यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी आणि पुढील चार दिवस झालेले व्यवहार आणि खरात याला मेसेज आलेले. समता पतसंस्थेमधून खरात यांच्या फोनवर मेसेज आले होते त्याची चौकशी झालीच पाहिजे. किती पैशांची देवाणघेवाण झाली ते अजून कळले नाही”. 
“27 जानेवारी अजित पवार यांचा अपघात होण्याआधी 17 मेसेज आणि अपघात घडला त्यादिवशी म्हणजेच 28 जानेवारी रोजी 19 मेसेज, 29 जानेवारीला 10 मेसेज, तर 30 आणि 31 जानेवारीला प्रत्येकी 8 मेसेज आले. त्यानंतरचे पुढचे काही दिवस सातत्याने 15  मेसेज असायचे. जे मेसेज कधी महिनाभरातही येत नव्हते, ते एका दिवसात येऊ लागले. नेमकं काय घडलं? त्यातून पैसे काढले गेले, फिरवले गेले मला माहिती नाही यंत्रणेने शोधा”. 

“मी काय cdr कोणाकडून बळकावला का? कसल्या अडचणीत वाढ होणार आहे? समित्या बसतात पण खरी माहिती समोर आणत नाही. लोकांसमोर आणलं गेल असत का? एकनाथ शिंदे यांना विचारायचं नाही का? अजित पवार यांच्या अपघाताची संबंध असण्याची दाट शक्यता आहे. काय व्यवहार झाले ते बाहेर आलं पाहिजे. आपला लढा खरात यांच्या विरोधात आहे”. अंजली दमानिया यांच्या या खुलास्याने केवळ वैयक्तिक संबंधांवरच नाही, तर राजकीय साठगाठीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number