मालेगावच्या एमएसजी महाविद्यालयात पुण्याच्या सत्य मलिक लोक सेवा ग्रुपतर्फे भारतीय छात्र आणि विध्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख्य व्याख्यात्यांनी प्रथम कुराणमधील कलमा पढवत इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमाप्रमाणे शिक्षण करण्याचे आमिष दाखवून धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमस्थळी दाखल होत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मालेगावमध्ये तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही लोकांना ताब्यात घेतले. महाविद्यालय प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट कॅम्प पोलिस स्थानक गाठत ठाण मांडले. वस्तुस्थिती आणत पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.