‘अनिल पाटीलांना मंत्रिपद मिळायला हवं’ संजय पवारांचं वक्तव्य

भौगोलिक, सामाजिक विचार करून अजित पवार यांनी मंत्रीपदाची संधी अनेकांना दिली. परंतु जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये आमदारांनी पाटील हे आमचे एकमेव आमदार आहेत त्यामुळे आम्हाला मंत्रिपद अपेक्षित होते

‘अनिल पाटीलांना मंत्रिपद मिळायला हवं’ संजय पवारांचं वक्तव्य

मुंबई: मंत्रिमंडळ विस्तारानंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मंत्रीपद न मिळाल्याची नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “भौगोलिक आणि सामाजिक विचार करून अजित पवार यांनी मंत्रीपदाच्या वाटपात अनेकांना संधी दिली आहे. मात्र, जळगावसारख्या जिल्ह्यांतून आमचे प्रतिनिधित्व करणारे अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळायला हवे होते.”

संजय पवार यांनी स्पष्ट केले की, “अनिल पाटील हे आमचे जळगाव जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे मंत्रीपदाची अपेक्षा होती. मंत्रीपद नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी आहे. परंतु अजित पवार यांनी मंत्रिमंडळाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल असे सांगितले आहे. त्यामुळे आगामी कालावधीत अनिल पाटील यांना नक्कीच संधी मिळेल, असा विश्वास आहे.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करत संजय पवार म्हणाले, “आमच्याकडे मंत्रिपद नसले तरी आगामी निवडणुकांमध्ये आम्ही चांगले यश मिळवू. मात्र, जर मंत्रीपद मिळाले असते, तर त्याचा कार्यकर्त्यांच्या मनोबलावर अधिक सकारात्मक परिणाम झाला असता. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमचे स्थान अधिक मजबूत झाले असते.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number