‘एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार’

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. या पार्शभूमीवर आज राज्याच परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.टाळेबंदीच्या काळात एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर देखील चालतील. परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार आहेत.या संदर्भात एसटीचा […]

‘एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार’

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. या पार्शभूमीवर आज राज्याच परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.टाळेबंदीच्या काळात एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

‘जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर देखील चालतील. परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार आहेत.या संदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी चालतील फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील.’, असं अनिल परब म्हणाले आहेत.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number