NCP Ajit Pawar : राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याचा अचानक सर्व पदांसाठी राजीनामा; शिवसेनेच्या वाटेवर?

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज गुरुवार 14 मे रोजी पक्षाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांना सोपविला आहे.

NCP Ajit Pawar : राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याचा अचानक सर्व पदांसाठी राजीनामा; शिवसेनेच्या वाटेवर?

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज गुरुवार 14 मे रोजी पक्षाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांना सोपविला आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक – ठाणे व पालघर (जिल्हा) व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

आजपर्यंत पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून पक्ष संघटनेमध्ये अनेक जबाबदा-या दिल्या. त्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे.तरी माझा राजीनामा आपण स्विकारावा ही नम्र विनंती’ असं पत्रात म्हणतं आनंद परांजपे यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आनंद परांजपे यांनी अलिकडेच भेट घेतली होती. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून आनंद परांजपे शिवसेनेत जाणार अशा चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे यांची पुढची भूमिका काय असणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

हेही वाचा- Raj Thackeray on NEET Paper Leak : ‘NEET’ लादण्याची गरज नव्हती, पण सरकारची खुमखुमी इतकी तीव्र… राज ठाकरे यांनी उपटले सरकारचे कान
दरम्यान यावेळी आनंद परांजपे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, “मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा 14 वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे..!”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number